मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

महावीराचार्य – भारताचे प्रख्यात जैन गणितज्ञ

     भारत ही भूमी प्राचीन काळापासून विज्ञान, गणित आणि ज्योतिष यांसारख्या विषयांची जननी राहिली आहे. या गौरवशाली परंपरेत एक अत्यंत मोलाचा आणि विस्मरणात गेलेला रत्न म्हणजे – महावीराचार्य . गणिताच्या क्षेत्रात त्यांचे योगदान इतके मोठे आहे की, ते भारतीय गणितशास्त्राच्या सुवर्ण पानांवर कोरले गेले आहे . परिचय      महावीराचार्य यांचा जन्म अंदाजे इ.स. ८व्या-९व्या शतकात झाला. ते जैन धर्माचे अनुयायी होते आणि कर्नाटकातील समृद्ध भागात जन्मले. त्यांना महावीराचार्याचार्य असेही संबोधले जात असे. ते एक महान गणितज्ञ आणि ज्योतिषाचार्य होते. त्यांचे सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे – "गणितसारसंग्रह" . हा ग्रंथ भारतीय गणिताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गणितसारसंग्रह – एक ऐतिहासिक ग्रंथ      महावीराचार्य यांनी रचलेला "गणितसारसंग्रह" हा भारतातील पहिला व्यवस्थित बीजगणितावर आधारित ग्रंथ मानला जातो. यामध्ये एकूण ९ प्रकरणे आहेत, ज्यामध्ये गणिताचे अनेक विषय स्पष्ट, सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह मांडले आहेत. या ग्रंथातील विषय: बेरीज, वजाब...

मौन म्हणजे काय?

एखादा  व्यक्ती जर बोलत नसला तरी गरजेचे नाही की तो व्यक्ती मौन आहे. कदाचित तो खुप बडबड करत असेल, जोरा जोरात ओरडत असेल पण मनातल्या मनात, फक्त तो मनात बोलत असल्यामुळे पल्याला ऐकू येत नाहीये पण याचा अर्थ तो व्यक्ती मौन आहे असा होत नाही. मौन म्हणजे काय?  ढोबळपणे मौन राहण्याचे तीन प्रकार करू शकतो. बाह्य मौन :- न बोलने किंवा गप्प राहणे. तोंडाने न बोलणे, पण मनात विचार चालू आहेत, कोणी काही विचारलं तर इशारा करून उत्तर देणे या प्रकारच्या मौन धारण करणे या प्रकारात येते. अंतर्गत मौन :- मनातले विनाकारण चाललेल्या विचारांचे शांत होणे या प्रकरच्या मौनात येते. या प्रकारचे मौन साध्य करण्यासाठी बाह्य मौन धारण केले जाते. आर्य मौन :- ज्यावेळी मी विपश्यना करायला गेलो होतो त्यावेळी मला या प्रकारच्या मौन धारण करण्या बद्दल कळाले होते. हा मौन धारण करण्याचा सर्वोत्तम प्रकार आहे असे म्हटले तरी त्यात काही गैर नाही. या काया, वाचा आणि मन या तिन्ही प्रकारचे मौन पाळले जाते. म्हणजे ना मनात काही बोलायचे, ना इशारा करून काही संवाद साधायचा आणि ना तोंडाने काही बोलायचे. मौन धारण करण्याचे फायदे (Benifits of sile...

ध्यानाचे प्रकार - विचार ध्यान

चीन मध्ये एकदा एक माणसाने एका भिक्षुकडे हट्ट धरला... महाराज मला एखादा मंत्र द्या ज्याला मी सिध्द करू शकेल आणि ज्या मंत्राच्या सिध्द केल्याने मला लाभ होईल.. भिक्षुने नकार दिला पण तो माणुस काही ऐकायला तयारच नव्हता, सकाळची संध्याकाळ झाली पण तो माणूस काही भिक्षुचा पिच्छा सोडत नाही असे बघुन त्याला एक मंत्र सांगितला आणि सागितले की या मंत्राचा पुढच्या पंधरा दिवसांच्या आत सलग सात दिवस ठराविक वेळा जप करावा लागेल तरच हा मंत्र सिद्ध होईल, जर पुढच्या पंधरा दिवसात तु हा मंत्र सिद्ध नाही केला तर हा मंत्र काही कामाचा राहणार नाही. मंत्र घेऊन तो माणूस आनंदाने घरी चाललाच होता की तेव्हढ्यात त्या भिक्षुने त्याला मागुन आवाज दिला. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलि. भिक्षु म्हणाले. या मंत्राचा माकड खुप मोठा दुश्मन आहे जर मंत्र जपाच्या सात दिवसांत एकदा जरी तुझ्या मनात माकडाचा विचार आला तर तुला दुसर्‍या दिवशी पुन्हा सुरवात करावी लागेल, त्यामुळे काहीही झाल तरी एक लक्षात ठेव, तुझ्या मनात माकडाचा विचार नाही आला पाहिजे याची काळजी घे. भिक्षुने चेतावणी वजा सूचना दिली. हो, तसाही कोणाच मन माकडाचा विचार करतं पण तरीही त...

ध्यानाचे प्रकार - आनापान

मला ध्यानधारणा करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि आनंददायी वाटणारी पध्दत... आनापान ही ध्यान सुमारे २६०० वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी शिकवली.... ध्यान नेमक कशावर किंवा कशाच करायचे?  ध्यानाला सुरवात करण्या अगोदर आपल्याला आलंबन निवडावे लागेल. आता आलंबन म्हणजे काय? तर आपल्याला एखादी अशी गोष्ट ज्यावर आपल्याला मन केंद्रित करायचे आहे. उदा. तुम्ही मंत्र ध्यान करत असाल तर तुम्ही जो काही मंत्र निवडला आहे तो मंत्र म्हणजे तुमचे आलंबन. आपण आनापान संदर्भात बोलायचे तर आपला येणारा जाणारा श्वास आपले आलंबन निवडणार आहोत.  मंत्र ध्यान कसे करायचे? आनापान ध्यान म्हणजे काय? आन = येणारा श्वास अपान = जाणारा श्वास थोडक्यात येणार्‍या जाणार्‍या श्वासावर लक्ष देणे म्हणजे आनापान ध्यान. आनापान ध्यान कसे करायचे? १) आरामदायक स्थितीमध्ये पण कंबर, पाठ आणि मान सरळ राहील असे बसने. (हव तर मांडी घालून किंवा खुर्चीवर दोन्हीपैकी जे सुखकर होईल असे बसने) २) अलगदपणे डोळे बंद करने ३) येणाऱ्या - जाणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रीत करने. कोणतेही ध्यान करताना एक गोष्ट सारखी होत राहते आणि ती म्हणजे लक्ष भटकणे उदा. तुम्ही ...

ध्यान म्हणजे काय?

भरपुर वेळ झाला तो माणूस तिथेच त्या टेकडीवर थांबलाय... काय करत असेल तो माणूस? मोकळ्या हवेला बसलेल्या तिन मित्रांपैकी एकाने समोरच्या टेकडीकडे बोट दाखवून विचारले.. तो नक्कीच त्याच्या एखाद्या जनावरांच्या शोधात असेल कारण त्या टेकडीवरून आजुबाजुचे भरपुर दूरपर्यंत दिसते... दुसर्‍याने उत्तर दिले.. पण तो किती वेळेपासून एकाच दिशेला तोंड करून उभा आहे.. त्यामुळे मला नाही वाटत तो तिथे जनावराचा शोध घेण्यासाठी गेला असेल कदाचित तो त्याच्या मागुन येणाऱ्या साथीदाराची वाट बघत असेल... तिसरा म्हणाला..  नाहि रे मला वाटते तो नक्कीच तिथे ध्यानधारणा करत असेल.. पहिला म्हणाला.  तिघांचेही एकमत काही होत नाही अस पाहून आपण त्यालाच जाऊन विचरूयात तसही आपण  खुप वेळचे बसलो आहोत त्या निमित्ताने आपली एक मस्त चक्कर होईल या विचाराने तिघे त्या टेकडीवर गेले, त्या तिघांनी टेकडीवर जाऊन तिथे थांबलेल्या माणसाला सगळे सविस्तर सांगितले आणि विचिरले की आम्ही तिघे कितीतरी वेळेपासून तुमचे निरीक्षण करत आहोत आम्हाला या गोष्टीची उत्सुकता लागली आहे की तुम्ही ईतक्या वेळेपासून या टेकडीवर थांबुन नक्की काय करत आहात? मी तर फक्त थांब...

ध्यानाचे प्रकार - मंत्र ध्यान

ध्यान करण्यासाठी जी मनाची पुर्वतयारी करावी लागेल त्या बद्दल आपण आपल्या मागिल मागात पाहिले. आज आपण ध्यान करण्याच्या अनेक पध्दतिपैकी एक पध्दत म्हणजेच मंत्र ध्यान (Mantra Meditation) काय आहे व ते कसे करायचे याबद्दल माहिती करून घेणार घेणार आहोत... तर चला मग करूया सुरवात.. मंत्र म्हणजे काय?   मनाची तुलना अनेक ऋषि मुनिंनी माकडासोबत केली आहे जे कधिही शांत बसत नाही त्याच मनाला शांत करण्यासाठी ध्यान केले जाते, अर्थात त्याचे अनेक आध्यात्मिक पैलू देखील आहेत, पण त्यावर अत्ता चर्चा नको..  मंत्र हा शब्द मं=मन + त्र = रक्षण करणारा असा आहे म्हणजेच असे म्हटले तर हरकत नाही की मनाचे रक्षण करण्यासाठी वापरलेला शब्द, वाक्य कींवा ध्वनी म्हणजे मंत्र. मंत्राची निवड  आता मंत्र ध्यान करायला एखादा मंत्र तर हवा. तर तो कसा निवडणार? तर आपण कोणता मंत्र वापरावा? भारतिय परंपरेत अनेक पवित्र मंत्र आहेत उदाहरण द्यायचे झाले तर गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि आणखी खुप सारे पण आपल्याला मोठ्या मंत्राच्या ऐवजी लहान म्हणजे बीजमंत्राचा वापर करणे जास्त सोयीचे होईल, जसे की ॐ नमः शिवाय, ॐ नमो दत्ताय कीं...

ध्यान आणि ध्यानाची पूर्वतयारी

तुम्ही जर ध्यान कसे करावे या प्रश्नाचे उत्तर शोधत आहात तर तुम्ही योग्य जागी आहात. आपण आजच्या पोस्ट मध्ये ध्यान किंवा meditation याच विषयावर चर्चा करणार आहेत. ध्यान धारणेची परंपरा प्राचीन काळापासून भारतात आहे, आपल्याला अनेक ध्यानी ऋषी मुनींचे वर्णन आपल्या रामायण, महाभारत व ईतर साहित्यात मिळते. योग आणि ध्यान वेगवेगळे आहेत का? पतंजली योग सुत्रांमध्ये अष्टांग योगाचे वर्णन आपल्याला मिळते. अष्टांग म्हणजे आठ अंग किंवा आठ भाग ते पुढिल प्रमाणे :- यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी. याचाच अर्थ असा की योग ह्या प्रक्रिया मधल्या ध्यान हा एक भाग आहे.  आज आपण प्रामुख्याने धारणा आणि ध्यान यावर चर्चा करणार आहे. धारणा म्हणजे काय?  जसे मी माझ्या मागील ध्यानाचे फायदे या ब्लाॅगमध्ये बोललो होतो एखादी गोष्टं किंवा घटना आपण आपल्या मनात किती वेळ धरून ठेऊ शकतो ही क्षमता म्हणजे आपली धारणाशक्ती. पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर एक उदाहरण घेऊन आपल्याला धारणा, ध्यान आणि समाधी समजुन घेता येईल. समजा तुम्ही एखाद्या देवाच्या प्रतिमेचे ध्यान करत आहात तर डोळे मिटून तुम्ही त्या प्रतिमेची स...