मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ध्यानाचे प्रकार - मंत्र ध्यान

ध्यान करण्यासाठी जी मनाची पुर्वतयारी करावी लागेल त्या बद्दल आपण आपल्या मागिल मागात पाहिले. आज आपण ध्यान करण्याच्या अनेक पध्दतिपैकी एक पध्दत म्हणजेच मंत्र ध्यान (Mantra Meditation) काय आहे व ते कसे करायचे याबद्दल माहिती करून घेणार घेणार आहोत... तर चला मग करूया सुरवात.. मंत्र म्हणजे काय?   मनाची तुलना अनेक ऋषि मुनिंनी माकडासोबत केली आहे जे कधिही शांत बसत नाही त्याच मनाला शांत करण्यासाठी ध्यान केले जाते, अर्थात त्याचे अनेक आध्यात्मिक पैलू देखील आहेत, पण त्यावर अत्ता चर्चा नको..  मंत्र हा शब्द मं=मन + त्र = रक्षण करणारा असा आहे म्हणजेच असे म्हटले तर हरकत नाही की मनाचे रक्षण करण्यासाठी वापरलेला शब्द, वाक्य कींवा ध्वनी म्हणजे मंत्र. मंत्राची निवड  आता मंत्र ध्यान करायला एखादा मंत्र तर हवा. तर तो कसा निवडणार? तर आपण कोणता मंत्र वापरावा? भारतिय परंपरेत अनेक पवित्र मंत्र आहेत उदाहरण द्यायचे झाले तर गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि आणखी खुप सारे पण आपल्याला मोठ्या मंत्राच्या ऐवजी लहान म्हणजे बीजमंत्राचा वापर करणे जास्त सोयीचे होईल, जसे की ॐ नमः शिवाय, ॐ नमो दत्ताय कींवा हरी ॐ नमो न