मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

marathi stories लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ध्यान म्हणजे काय?

भरपुर वेळ झाला तो माणूस तिथेच त्या टेकडीवर थांबलाय... काय करत असेल तो माणूस? मोकळ्या हवेला बसलेल्या तिन मित्रांपैकी एकाने समोरच्या टेकडीकडे बोट दाखवून विचारले.. तो नक्कीच त्याच्या एखाद्या जनावरांच्या शोधात असेल कारण त्या टेकडीवरून आजुबाजुचे भरपुर दूरपर्यंत दिसते... दुसर्‍याने उत्तर दिले.. पण तो किती वेळेपासून एकाच दिशेला तोंड करून उभा आहे.. त्यामुळे मला नाही वाटत तो तिथे जनावराचा शोध घेण्यासाठी गेला असेल कदाचित तो त्याच्या मागुन येणाऱ्या साथीदाराची वाट बघत असेल... तिसरा म्हणाला..  नाहि रे मला वाटते तो नक्कीच तिथे ध्यानधारणा करत असेल.. पहिला म्हणाला.  तिघांचेही एकमत काही होत नाही अस पाहून आपण त्यालाच जाऊन विचरूयात तसही आपण  खुप वेळचे बसलो आहोत त्या निमित्ताने आपली एक मस्त चक्कर होईल या विचाराने तिघे त्या टेकडीवर गेले, त्या तिघांनी टेकडीवर जाऊन तिथे थांबलेल्या माणसाला सगळे सविस्तर सांगितले आणि विचिरले की आम्ही तिघे कितीतरी वेळेपासून तुमचे निरीक्षण करत आहोत आम्हाला या गोष्टीची उत्सुकता लागली आहे की तुम्ही ईतक्या वेळेपासून या टेकडीवर थांबुन नक्की काय करत आहात? मी तर फक्त थांब...

किमयागारांचे गणित

पिकासो… खुप कमी लोक असतिल ज्यांने पिकासोचे नाव सुध्दा ऐकले नसेल. पिकासो हा मागच्या शतकातिल.. खर तर आजपर्यंत झालेल्या महत्वाच्या आणि जिनियस पेंटरस पैकि एक महत्वाचा पेंटर, तर तो एकदा प्रवासादरम्यान एका लहानशा गावात थांबला होता तस त्या गावकऱ्यापैकि कोणी त्याला ओळखेल याची शक्यता थोडीशी कमीच पण तो ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होतो तिथे असणाऱ्या एका महिलेने पिकासो ला ओळखले व एकदा सहज गप्पा मारता मारता तिने पिकासोकडे तिच्यासाठी एखदी पेंटिग बनवावि असा हट्रट धरला, त्यावर पिकासो म्हणाला कि सध्या मी प्रवासात आहे त्यामुळे माझ्याकडे पेंटिंग करण्यासाठी सामग्री नाही आहे, मी नंतर कधितरी नक्की तुमच्यासाठी पेंटिग बनवेल.. यावर ती महिला पिकासोला म्हणालि कि तुमच्यासारख्या व्यस्त माणसाची परत कधि भेट होईल कि नाही माहित नाही त्यामुळे प्लिज माझ्यासाठी तुम्हि आत्ताच एखादी पेंटिग बनवा मी तुमची खुप मोठी चहाती आहे. यावर पिकासोने हॉटेलच्या काऊंटर वरुन एक कागद आणि पेन घेऊन अवघ्या २० मि. मध्येच एक चित्र् रेखाटले. काहि क्षण विचार करुन ते चित्र त्या महिलेच्या हातात देत देत म्हणाले कि याची किमंत असेल १ मिलियन डॉलर. त्या...

भरलेले गाडगे

हि थोडीशी जुनी गोष्ट आहे ज्यावेळी अनेकदा लोकं एका गावावरुन दुसऱ्या गावाला पायी चालत जात.. असाच आज एक माणूस आपल्या गावाहून शेजारच्या गावी चालला होता , रस्ता जनुकाहि मोकळाच क्वचितच एखादा प्रवासी दिसत होता. काहीसा पठारी प्रदेश आणि डोक्यावर तळपता सुर्य आणि यामुळे आलेला थकवा आणि लागलेलि तहान यामुळे त्या माणसाचा जिव अगदी कासाविस झाला होता , आता खर तर त्याला पलिकडचं गाव गाठण्यापेक्षा पाणि पिने जास्त गरजेचे होते. एक दोन वेळा आधि मित्रांसोबत याच रस्त्याने गेलेला असल्याने त्याला जवळच एक लहानसा तलाव असलेला माहीती होते , तो तलाव थोडा आडमार्गि असून देखिल तो त्या तलावा जवळ गेला... एक... एक मिनिट थोडस थांबवतोय तुम्हाला पुढे सांगण्याआधि त्यासाठी माफ करा पण मला थोडस विचार करुन सांगा कि या परीस्थितित तुम्ही असता तर यावेळी तुम्ही काय केल असतं... ? तुम्ही म्हणाल काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोय हा.. बरोबर ना ? बरं जाऊद्या आपण गोष्ट पुढे नेऊयात. तलावा समोर गेल्यावर त्याला जरास हायसं वाटलं पण तो माणुस तसाच त्या तलावाकडे बघत ऊभा राहिला होता , त्यामाणसाला पाणि प्यायची इच्छा असून देखिल तो तसाच पण्याकडे...

व्यस्तपणा आणि धावपळ

आजचे युग हे व्यस्तपणाच युग आहे. आज प्रत्येक जणं काही ना काही काम करण्यात व्यस्त आहे मान्य आहे की काही जणं खरेच काही तरी महत्वाची कामे करण्यात व्यस्त आहेत , आपल्यापैकी कित्येक जणं उगाचचं व्यस्त आहेत , किमान आपण तस स्वत:ला भासवत तरी आहोत. कधी कधी खरेच काम करण्यात व्यस्त आहोत , काही काम नसेल तेव्हा Game खेळण्यात व्यस्त आहोत T.V. बघण्यात व्यस्त आहोत अगदिच काही नसेल तेव्हा स्वत:च्याच भुतकाळाच्या आठवणिमध्ये व्यस्त आहोत , कोणी स्वत:च्याच भुतकाळा पासून पळ काढण्यासाठी व्यस्त आहे तर आणखि कोणी माहिती नाहि कशा - कशात व्यस्त आहे. पण आपण आज व्यस्त आहोत हे मात्र खरं आहे , बरोबर ना ? कारण व्यस्त राहणे ही आजकालची fashion होऊन बसलिए आपण जर व्यस्त नसतोल तर आज आपल्याला अस वाटते की आपण काहीतरी चूकिचे करत आहोत , की काय कारण आपण आज एका जागि शांत बसणे विसरत चाललोय . शांत बसायचे म्हंटल की अगदि नको - नको ते विचार आपल्या मनात यायला चालू होतात. अर्थात याला कित्येक जणं अपवाद असतिलचं. पणं सर्वसाधारण पणे म्हंटलं तरी हे सत्यच आहे की आपल्याला व्यस्त असण्याची सवय झालि आहे. खरे आहे ना ? पणं कित्येक गोष्टी ज्या आपण श...

नशिबाच्या दारावरचे कुलुप

काही वर्षांपूर्वी एक महान जादूगार खुप प्रसिद्धीस आला, त्याच्या या प्रसिद्ध कारण होते त्याची एक खास कला ज्यामधे त्याने प्राविण्य मिळवलेले होते. काय होती ती कला? अस काय होतं जे त्याला इतर जादूगरांंपासून वेगळ करत होते? तर ती कला होती कुलुप उघडण्याची कला हा जादूगर अगदी कोणतेही कुलुप असेल तरी ते इतक्या शिताफीने उघडायचा की बघणारा अक्षरशः अवाक होऊन पाहात रहायचा. आणि हेच ते कारण होते की हा जादूगर इतका प्रसिद्ध होता. तर त्याची ख्याती ऐकुन एका पोलिसाने त्याला आव्हान द्यायचे ठरवले. खरतर या आधि सुध्दा जादूगाराला अनेकदा असे आव्हान अनेकांनी दिले होते आणि जादूगाराने ते पुर्ण सुध्दा दाखवले होते आणि यामुळेच की काय पण त्याला या आव्हानाची काही खास काळजी नव्हतीच. ठरलेल्या वेळी जादूगार त्या पोलीस ठाण्यात आव्हान पुर्ण करण्यासाठी पोहचला, आता कारण खुप प्रसिध्द जादूगार असल्यामुळे जिथे हा प्रयोग व्हायचा होता तिथे खुप गर्दी झाली होती अनेक मिडिया वाले - सामान्य लोक यांनी ते स्थान अगदी तुडुंब भरले होते. जादूगार साठी हा नेहमीचाच प्रसंग होता त्याने असे अनेक प्रयोग यशस्वीपणे पार पाडले होते, तो आत्मविश्वासही त्याच्य...