भरपुर वेळ झाला तो माणूस तिथेच त्या टेकडीवर थांबलाय... काय करत असेल तो माणूस? मोकळ्या हवेला बसलेल्या तिन मित्रांपैकी एकाने समोरच्या टेकडीकडे बोट दाखवून विचारले.. तो नक्कीच त्याच्या एखाद्या जनावरांच्या शोधात असेल कारण त्या टेकडीवरून आजुबाजुचे भरपुर दूरपर्यंत दिसते... दुसर्याने उत्तर दिले.. पण तो किती वेळेपासून एकाच दिशेला तोंड करून उभा आहे.. त्यामुळे मला नाही वाटत तो तिथे जनावराचा शोध घेण्यासाठी गेला असेल कदाचित तो त्याच्या मागुन येणाऱ्या साथीदाराची वाट बघत असेल... तिसरा म्हणाला.. नाहि रे मला वाटते तो नक्कीच तिथे ध्यानधारणा करत असेल.. पहिला म्हणाला. तिघांचेही एकमत काही होत नाही अस पाहून आपण त्यालाच जाऊन विचरूयात तसही आपण खुप वेळचे बसलो आहोत त्या निमित्ताने आपली एक मस्त चक्कर होईल या विचाराने तिघे त्या टेकडीवर गेले, त्या तिघांनी टेकडीवर जाऊन तिथे थांबलेल्या माणसाला सगळे सविस्तर सांगितले आणि विचिरले की आम्ही तिघे कितीतरी वेळेपासून तुमचे निरीक्षण करत आहोत आम्हाला या गोष्टीची उत्सुकता लागली आहे की तुम्ही ईतक्या वेळेपासून या टेकडीवर थांबुन नक्की काय करत आहात? मी तर फक्त थांबलो आहे.. त्या
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू।। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका।। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव।