मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मौन म्हणजे काय?

एखादा  व्यक्ती जर बोलत नसला तरी गरजेचे नाही की तो व्यक्ती मौन आहे. कदाचित तो खुप बडबड करत असेल, जोरा जोरात ओरडत असेल पण मनातल्या मनात, फक्त तो मनात बोलत असल्यामुळे पल्याला ऐकू येत नाहीये पण याचा अर्थ तो व्यक्ती मौन आहे असा होत नाही. मौन म्हणजे काय?  ढोबळपणे मौन राहण्याचे तीन प्रकार करू शकतो. बाह्य मौन :- न बोलने किंवा गप्प राहणे. तोंडाने न बोलणे, पण मनात विचार चालू आहेत, कोणी काही विचारलं तर इशारा करून उत्तर देणे या प्रकारच्या मौन धारण करणे या प्रकारात येते. अंतर्गत मौन :- मनातले विनाकारण चाललेल्या विचारांचे शांत होणे या प्रकरच्या मौनात येते. या प्रकारचे मौन साध्य करण्यासाठी बाह्य मौन धारण केले जाते. आर्य मौन :- ज्यावेळी मी विपश्यना करायला गेलो होतो त्यावेळी मला या प्रकारच्या मौन धारण करण्या बद्दल कळाले होते. हा मौन धारण करण्याचा सर्वोत्तम प्रकार आहे असे म्हटले तरी त्यात काही गैर नाही. या काया, वाचा आणि मन या तिन्ही प्रकारचे मौन पाळले जाते. म्हणजे ना मनात काही बोलायचे, ना इशारा करून काही संवाद साधायचा आणि ना तोंडाने काही बोलायचे. मौन धारण करण्याचे फायदे (Benifits of silence) -  १