मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्व संवाद - एकांत

किती तरी वेळा आपण एकाकीपण आणि एकांत यामध्ये गोंधळ करून टाकतो... आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत म्हणजे एकांतात आहोत पण खरेच असे असते...? तूकाराम महाराज म्हणतात एकांतात आपलाच आपल्या सोबत वाद (बोलणे) चालु असतो.... काय बरोबर, काय चुकीचे याचा विचार आपण एकांतात करू शकतो... पण हल्लीच्या मनोरंजनाच्या विश्वात आपण मोकळे बसलो की आपण एकांत अनुभवण्या ऐवजी एकटेपणा अनुभवतो.... कराटे कीड नावाच्या एका सिनेमा मधिल एक खुप सुंदर आणि अर्थपुर्ण वाक्य मला ईथे आठवते.... "शांत होना और कुछ ना करना ये दोनो अलग बाते है" ज्या वेळी आपण एकटेपणाचा अनुभव करतो त्या वेळी आपण खुपदा उदास होतो पण एकांतात आपण शांत असतोत... एखाद्या घटनेचा विचार करताना एकटेपणा बाधक तर एकांत सहाय्यक असतो... शांत होना और कुछ ना करना ये दोनो अलग बाते है