मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय गणिती (गणितज्ञ) - भाग ४

आर्यभट्ट द्वितीय ( aryabhatta dvitiy ) :-            भारतात दोन आर्यभट्ट नावाचे गणिती होऊन गेले. या दुसर्‍या आर्यभट्ट ला आपण आर्यभट्ट द्वितीय म्हणु. हे आर्यभट्ट ब्रम्हगुप्त नंतर व भास्कराचार्य (भास्कर द्वितीय) यांच्या आधी होऊन गेले.            यांनी महासिध्दांत हा गणित ग्रंथ लिहिला. भास्कराचार्यांनी यांचा उल्लेख केलेला आहे या वरुन हे आर्यभट्ट एक महान गणिती होते व त्यांना समाजमान्यता मिळाली होती हे लक्षात येते, व ब्रम्हगुप्त यांचा कुठल्याही प्रकारे उल्लेख करत नाही म्हणजेच हे आर्यभट्ट द्वितीय हे ब्रम्हगुप्त नंतर होते असा अंदाज बांधता येतो.             यांनी गणिताला एक नविन आणि वापरायला सोपी अशी अक्षरांक पध्दत दिली. अंकांना अक्षरात मांडण्याची कल्पना काही नवीन नव्हती. वेदांमध्ये सुध्दा अनेक संख्या लिहिण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा वापर केलेला दिसुन येतो आणि आर्यभट्ट यांनी सुध्दा एक अक्षरांक पध्दत विकसित केली होती. त्यांचा ग्रंथ सोडला तर ती पध्दत कुठेही वापरली गेली नाही हा भाग वेगळा पण आर्यभट्ट द्वितीय यांनी विकसित केलेल्या कटपयादि या पध्दतीला गणित जगतात मानाचे स्थान मिळाले. कटपयादि पध्द