"अरे, तुझ्याकडे पन्नास रुपये असतील का? उद्या सकाळी देतो."रोहनने हे विचारताना आवाजात सहजपणा आणण्याचा प्रयत्न केला. पण ती नोट हातात पडली तेव्हा आतमध्ये कुठेतरी काहीतरी टोचलं. पन्नास रुपये... आज महिन्याचा फक्त बावीसावा दिवस होता. पगार यायला अजून आठ दिवस बाकी होते. बँक अकाउंट जवळपास रिकामं होतं. UPI उघडून बॅलन्स पाहायचीसुद्धा त्याची हिंमत होत नव्हती. संध्याकाळी तो घरी आला. बूट काढले. बॅग एका कोपऱ्यात फेकली आणि शांतपणे सोफ्यावर बसला. घरात सगळं होतं... मोठा टीव्ही... महागडा मोबाईल... EMI वर घेतलेलं फर्निचर... ब्रँडेड शूज... महागडं घड्याळ... पण मनात मात्र एकच प्रश्न फिरत होता. "मी नेमकं कमावतो तरी कुणासाठी?" काही वर्षांपूर्वीचं आयुष्य त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. तेव्हा तो एका छोट्याशा कंपनीत काम करायचा. महिन्याचा पगार फक्त १२,००० रुपये. घरभाडं... प्रवास... घरखर्च... सगळं करूनही महिन्याच्या शेवटी दोन-तीन हजार रुपये वाचायचे. कधी पाच हजार झाले तर तो स्वतःला श्रीमंत समजायचा. त्याच्या कपाटात एक छोटासा डबा होता. त्या डब्यात तो दर महिन्याला थोडेथोडे पैसे ठेवायचा...
शब्द सौंदर्य
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू।। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका।। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव।