भारत आणि गणित हे असे दोन विषय आहेत की ज्यातल्या एकाच्या महानतेची कहानी सांगायची झाल्यास दुसर्याचा उल्लेख केल्याशिवाय ती पुर्ण होणार नाही. तर मग भारताने गणितात जगाला असे काय योगदान दिले आहे की की भारताच नाव गणित इतिहासाशी जोडले जाते? तस पाहिल तर भारतात अनेक महान गणितज्ञ होऊन गेले. पण कोण होते ते? त्यांनी असे कुठले शोध लावले की गणित इतिहासात त्यांचे नाव अमर झाले? तुम्हाला सुद्धा असेच प्रश्न पडलेत? तर चला या सगळ्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे शोधुयात.प्रत्येक गणितीच (गणितज्ञाच) कार्य इतकं महत्वाचे आहे की सगळ्याच नाव आणि माहिती सांगणे गरजेचे आहे पण मला माहिती व जागे अभावि सध्या अवघड आहे. सुरुवात कुठून करावी? .... आज आपण कुणालाही (गणिता संदर्भात) खुप शहाणा समजतोस का? असा टोमणा मारायचा झाला तर आपण सहजपणे त्याला स्वतःला काय आर्यभट्ट समजतोस का? असे म्हणतो. भारताच्या प्रथम उपग्रहाचे नाव सुध्दा याच गणितज्ञाची आठवण म्हणून आर्यभट्ट ठेवण्या...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू।। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका।। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव।