मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

How to get rid of overthinking in marathi लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ध्यानाचे प्रकार - विचार ध्यान

चीन मध्ये एकदा एक माणसाने एका भिक्षुकडे हट्ट धरला... महाराज मला एखादा मंत्र द्या ज्याला मी सिध्द करू शकेल आणि ज्या मंत्राच्या सिध्द केल्याने मला लाभ होईल.. भिक्षुने नकार दिला पण तो माणुस काही ऐकायला तयारच नव्हता, सकाळची संध्याकाळ झाली पण तो माणूस काही भिक्षुचा पिच्छा सोडत नाही असे बघुन त्याला एक मंत्र सांगितला आणि सागितले की या मंत्राचा पुढच्या पंधरा दिवसांच्या आत सलग सात दिवस ठराविक वेळा जप करावा लागेल तरच हा मंत्र सिद्ध होईल, जर पुढच्या पंधरा दिवसात तु हा मंत्र सिद्ध नाही केला तर हा मंत्र काही कामाचा राहणार नाही. मंत्र घेऊन तो माणूस आनंदाने घरी चाललाच होता की तेव्हढ्यात त्या भिक्षुने त्याला मागुन आवाज दिला. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलि. भिक्षु म्हणाले. या मंत्राचा माकड खुप मोठा दुश्मन आहे जर मंत्र जपाच्या सात दिवसांत एकदा जरी तुझ्या मनात माकडाचा विचार आला तर तुला दुसर्‍या दिवशी पुन्हा सुरवात करावी लागेल, त्यामुळे काहीही झाल तरी एक लक्षात ठेव, तुझ्या मनात माकडाचा विचार नाही आला पाहिजे याची काळजी घे. भिक्षुने चेतावणी वजा सूचना दिली. हो, तसाही कोणाच मन माकडाचा विचार करतं पण तरीही त...