मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

benefits of meditation in marathi लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मौन म्हणजे काय?

एखादा  व्यक्ती जर बोलत नसला तरी गरजेचे नाही की तो व्यक्ती मौन आहे. कदाचित तो खुप बडबड करत असेल, जोरा जोरात ओरडत असेल पण मनातल्या मनात, फक्त तो मनात बोलत असल्यामुळे पल्याला ऐकू येत नाहीये पण याचा अर्थ तो व्यक्ती मौन आहे असा होत नाही. मौन म्हणजे काय?  ढोबळपणे मौन राहण्याचे तीन प्रकार करू शकतो. बाह्य मौन :- न बोलने किंवा गप्प राहणे. तोंडाने न बोलणे, पण मनात विचार चालू आहेत, कोणी काही विचारलं तर इशारा करून उत्तर देणे या प्रकारच्या मौन धारण करणे या प्रकारात येते. अंतर्गत मौन :- मनातले विनाकारण चाललेल्या विचारांचे शांत होणे या प्रकरच्या मौनात येते. या प्रकारचे मौन साध्य करण्यासाठी बाह्य मौन धारण केले जाते. आर्य मौन :- ज्यावेळी मी विपश्यना करायला गेलो होतो त्यावेळी मला या प्रकारच्या मौन धारण करण्या बद्दल कळाले होते. हा मौन धारण करण्याचा सर्वोत्तम प्रकार आहे असे म्हटले तरी त्यात काही गैर नाही. या काया, वाचा आणि मन या तिन्ही प्रकारचे मौन पाळले जाते. म्हणजे ना मनात काही बोलायचे, ना इशारा करून काही संवाद साधायचा आणि ना तोंडाने काही बोलायचे. मौन धारण करण्याचे फायदे (Benifits of sile...

ध्यानाचे प्रकार - मंत्र ध्यान

ध्यान करण्यासाठी जी मनाची पुर्वतयारी करावी लागेल त्या बद्दल आपण आपल्या मागिल मागात पाहिले. आज आपण ध्यान करण्याच्या अनेक पध्दतिपैकी एक पध्दत म्हणजेच मंत्र ध्यान (Mantra Meditation) काय आहे व ते कसे करायचे याबद्दल माहिती करून घेणार घेणार आहोत... तर चला मग करूया सुरवात.. मंत्र म्हणजे काय?   मनाची तुलना अनेक ऋषि मुनिंनी माकडासोबत केली आहे जे कधिही शांत बसत नाही त्याच मनाला शांत करण्यासाठी ध्यान केले जाते, अर्थात त्याचे अनेक आध्यात्मिक पैलू देखील आहेत, पण त्यावर अत्ता चर्चा नको..  मंत्र हा शब्द मं=मन + त्र = रक्षण करणारा असा आहे म्हणजेच असे म्हटले तर हरकत नाही की मनाचे रक्षण करण्यासाठी वापरलेला शब्द, वाक्य कींवा ध्वनी म्हणजे मंत्र. मंत्राची निवड  आता मंत्र ध्यान करायला एखादा मंत्र तर हवा. तर तो कसा निवडणार? तर आपण कोणता मंत्र वापरावा? भारतिय परंपरेत अनेक पवित्र मंत्र आहेत उदाहरण द्यायचे झाले तर गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि आणखी खुप सारे पण आपल्याला मोठ्या मंत्राच्या ऐवजी लहान म्हणजे बीजमंत्राचा वापर करणे जास्त सोयीचे होईल, जसे की ॐ नमः शिवाय, ॐ नमो दत्ताय कीं...

ध्यान आणि ध्यानाची पूर्वतयारी

तुम्ही जर ध्यान कसे करावे या प्रश्नाचे उत्तर शोधत आहात तर तुम्ही योग्य जागी आहात. आपण आजच्या पोस्ट मध्ये ध्यान किंवा meditation याच विषयावर चर्चा करणार आहेत. ध्यान धारणेची परंपरा प्राचीन काळापासून भारतात आहे, आपल्याला अनेक ध्यानी ऋषी मुनींचे वर्णन आपल्या रामायण, महाभारत व ईतर साहित्यात मिळते. योग आणि ध्यान वेगवेगळे आहेत का? पतंजली योग सुत्रांमध्ये अष्टांग योगाचे वर्णन आपल्याला मिळते. अष्टांग म्हणजे आठ अंग किंवा आठ भाग ते पुढिल प्रमाणे :- यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी. याचाच अर्थ असा की योग ह्या प्रक्रिया मधल्या ध्यान हा एक भाग आहे.  आज आपण प्रामुख्याने धारणा आणि ध्यान यावर चर्चा करणार आहे. धारणा म्हणजे काय?  जसे मी माझ्या मागील ध्यानाचे फायदे या ब्लाॅगमध्ये बोललो होतो एखादी गोष्टं किंवा घटना आपण आपल्या मनात किती वेळ धरून ठेऊ शकतो ही क्षमता म्हणजे आपली धारणाशक्ती. पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर एक उदाहरण घेऊन आपल्याला धारणा, ध्यान आणि समाधी समजुन घेता येईल. समजा तुम्ही एखाद्या देवाच्या प्रतिमेचे ध्यान करत आहात तर डोळे मिटून तुम्ही त्या प्रतिमेची स...

ध्यानाचे फायदे

ध्यान का करायला पाहीजे? (why everyone should meditate?) कींवा ध्यानाचे फायदे काय आहेत या बद्द्ल आपण थोडी चर्चा करणार आहोत.  आजकाल आपले जीवन खुपच धावपळीत चालले आहे, आपला दिवस घर - काम - घर आणि उरलेला वेळ मनोरंजनात व परीवार या सगळ्याचा विचार करण्यातच जातो यामुळे होत काय आहे की आपल्या मनावर येणारा ताण खुपच वाढत आहे, आपल्याकडे स्वत:साठी काही वेळ नाहिये. आपला दिवस भराचा वेळ कुठे निघून जातोय हे आपल्यालाच लक्षात येत नाही. आपण स्वतःला देखील वेळ देत नाही. बर ते जाऊ द्या आपण ध्यानधारणा करण्याचे काही फायदे कींवा benefits of meditation यावर चर्चा करूया ध्यान करण्याचे फायदे :- 1) मन शांत होते :- आपला मेंदू हा एखाद्या कथाकारा प्रमाणे असतो, आपले विचार आपला दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी आपण आपल्या नकळतपणे आपल्या सोयीनुसार समजून घेत असतो आणि पहायला गेलं तर त्यात किही चुकीचे नाही पण कित्येकवेळा आपल्या मनाची विनाकारण बडबड चालू असते. आजकाल तर प्रमाणाबाहेर विचार करण्याला ट्रेंड मानल जाते पण एकदा या पद्धतीने विचार करून पहा. अस समजा तुमच मन ही स्वतंत्र व्यक्ती आहे आणि सदैव तुमच्या सोबत असते. ...