संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) "ज्ञानेश्वर माऊली" अवघ्या महाराष्ट्राला भावार्थदिपिकेच (ज्ञानेश्वरीचेच आणखी एक नाव) ज्ञान देणारे संत. वडिल विठ्ठलपंत कुलकर्णी मुळातच विरक्त, लग्नानंतर त्यांनी सन्यास घेतला व काशीला निघून गेले. ज्यावेळी विठ्ठलपंतांच्या गुरुंना ते विवाहित असल्याचे समजले त्यावेळी त्यांनी विठ्ठलपंतांना परत घरी जाण्याचा आदेश दिला. विठ्ठलपंतांनी सुध्दा गुरुआदेशामुळे गृहस्थाश्रमात पुन्हा प्रवेश केला. त्यांना निवृत्ती (जन्म १२६८ किंवा १२७३), ज्ञानेश्वर (जन्म १२७१ किंवा १२७५), सोपान (जन्म यांच्या जन्मकाळ लक्षात आला नाहि पण ज्ञानेश्वरांपेक्षा २-३ वर्षांने लहान म्हणजेच १२७४ किंवा १२७८ च्या सुमारास झाला असावा), मुक्ताबाई (जन्म १२७९ ) अशी चार अपत्ये झाली. विठ्ठलपंत तीर्थयात्रे निमित्त आळंदी येथे आले व तीथेच स्थायिक झाले. सन्यासामधुन परत येऊन गृहस्थाश्रमी प्रवेश केलेला असल्यामुळे विठ्ठलपंतांच्या परिवाराला समाजाने वाळीत टाकले. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडा...