मुख्य सामग्रीवर वगळा

व्यस्तपणा आणि धावपळ


आजचे युग हे व्यस्तपणाच युग आहे. आज प्रत्येक जणं काही ना काही काम करण्यात व्यस्त आहे मान्य आहे की काही जणं खरेच काही तरी महत्वाची कामे करण्यात व्यस्त आहेत, आपल्यापैकी कित्येक जणं उगाचचं व्यस्त आहेत, किमान आपण तस स्वत:ला भासवत तरी आहोत. कधी कधी खरेच काम करण्यात व्यस्त आहोत, काही काम नसेल तेव्हा Game खेळण्यात व्यस्त आहोत T.V. बघण्यात व्यस्त आहोत अगदिच काही नसेल तेव्हा स्वत:च्याच भुतकाळाच्या आठवणिमध्ये व्यस्त आहोत, कोणी स्वत:च्याच भुतकाळा पासून पळ काढण्यासाठी व्यस्त आहे तर आणखि कोणी माहिती नाहि कशा - कशात व्यस्त आहे. पण आपण आज व्यस्त आहोत हे मात्र खरं आहे, बरोबर ना? कारण व्यस्त राहणे ही आजकालची fashion होऊन बसलिए आपण जर व्यस्त नसतोल तर आज आपल्याला अस वाटते की आपण काहीतरी चूकिचे करत आहोत, की काय कारण आपण आज एका जागि शांत बसणे विसरत चाललोय. शांत बसायचे म्हंटल की अगदि नको - नको ते विचार आपल्या मनात यायला चालू होतात. अर्थात याला कित्येक जणं अपवाद असतिलचं. पणं सर्वसाधारण पणे म्हंटलं तरी हे सत्यच आहे की आपल्याला व्यस्त असण्याची सवय झालि आहे. खरे आहे ना? पणं कित्येक गोष्टी ज्या आपण शांत पणे करू शकतो त्या सुध्दा आपण कित्येक वेळा घाई घाईने करतो, बरोबर ना? अर्थात आपलि कामे तर होतातचं पण त्या सोबतच आपल्याला नको असलेलि आणखि एक गोष्ट होते, आणि ती गोष्ट म्हणजे तणाव आणि हाच तणाव आज कित्येक आजारांचं कारण बनत चालला आहे. विचार करण्यासारखि बाब अशी आहे की काय आपणं या तणावाला टाळू शकत नाही का?
मला नेमके काय म्हणायचय ते समजण्यासाठी आपण एका गोष्टीचा आधार घेऊयात
एकदा एक लहान मगर एका मोठ्या मगरीकडे जाऊन म्हणते, मी ऐकले आहे की तुम्ही आपल्या तलावामधिल सगळ्यात अनुभवि आणि पारंगत शिकारी आहात ते, तुम्ही मला शिकार कशी करायची हे शिकवाल काय? ती म्हतारी मगरी तलावाच्या कीनाऱ्याजवळ झोपलेलि असते ती आपला एक डोळा उघडुन त्या लहान मगरीकडे बघते आणि परत डोळे मिटून घेते. त्यामुळे त्या लहान मगरीला खुप राग येतो त्या लहान मगरी आपला अपमान झ्याल्यासारख वाटते आणि मी दाखवते शिकार करुन अशा आर्विभावात तिथून ती निघुन जाते. थोड्यावेळाने ती बारकी मगर पुन्हा तिथे येते मोठी मगर अजूनही तिथेच झोपलेलि असते, बारकी मगर सांगु लागते की मी आज दोन मास्यांची शिकार केली, आतासुध्दा ती मोठी मगर बारक्या मगरीकडे दुर्लक्षच करते. हे बघुन त्या बारक्या मगरीला मात्र चांगलाच संताप येतो आणि ती तिथून तावातावात निघुन जाते. थोड्यावेळाने ती बारकी मगर पुन्हा त्या जागेवर येते आतामात्र तिच्या तोंडात दोन बगळे असतात, तिने ते त्या मोठ्या मगरीला दाखवण्यासाठी आणलेले असतात, पणं जेव्हा ती त्या किनाऱ्याजवळ पोहचते तेव्हा ती बघते जिथे ती मोठी मगरी झोपलेलि आहे तिथून जवळच एक चांगलि भरभक्कम म्हैस पाणी पित आहे, हे बघुन ती बारकी  मगर तिथेच थांबते. मोठी मगर शांतपणे अजूनही तिथेच झोपलेलि असते. जशी ती म्हैस आणखिन थोडी त्या मगरीच्या जवळ येते त्याच क्षणात ती मोठी मगर विजेच्या गतिने त्या म्हशिवर हल्ला करते आणि पकडून मारून टाकते, हे सगळ ती लहान मगर आश्चर्याने पाहत असते ती आपसूकच अत्यंत उत्सुकतेने त्या मगरीला विचारते, हे, हे तुम्ही कसं केलेत? यावर ती मोठी मगर जी त्या म्हशिचा आस्वाद घेण्यात व्यस्त असते ती त्या लहान मगरी पाहते हसते आणि म्हणते मी तर काहीच नाही केल.
आपण सगळे त्या लहान मगरी सारखे वागत असतो आपल्या कडे काही काम आले की आपण पुढचा मागचा विचार न करता ते लगेच चालु करतो आणि त्या कामात स्वत:ला व्यस्त करून घेतो यामुळे कदाचित काहि अंशी आपले काम होतही असेल पण सोबतच आपण बिनकामाच्या तणावाचाही शिकार होतो. मला वाटत कदाचित हेच कारण आहे आपल्या आजच्या ताणतणावपुर्ण आयुष्याचे. तुम्हाला काय वाटते या बद्दल?
 आपण विचार पुर्वक क्रियेपेक्षा जास्त प्रतिक्रियेला महत्व आणि प्राधान्य देतो पण या सवयीमुळे आपण स्वत:च स्वत:चे किती नुकसान करुन घेत आहोत याचा कदाचित आपल्याला अंदाजच नाहिये. शांत बसण्याचा संदर्भ कामधंदे सोडुन देण असा नाहिये पणं आपण करत असलेलि कामे आपण शांत चित्ताने आणि सजग पणे - विचार पुर्वक करावित असा आहे. आणि अस करण्यासाठी आपण कोणत्याहि घटनेवर किंवा गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया करण्या ऐवजी त्याच संदर्भात विचार पुर्वक आणि सजगतेने क्रिया करण्याची गरज आहे. बरोबर आहे ना? कितीही झालं,कसही असल तरी आपल काम तर आपल्यालाच कराव लागणार आहे. बरोबर की नाही? मग आपण करत असलेलेच काम घाई - घाईने करण्यापेक्षा जर शांत चित्ताने आणि आवडीने केले तर यात आपलाच फायदा नाहीये काय? विचार करण्यासारखि बाब आहे कारण शेवटी निर्माण होणाऱ्या ताण तणावाला आपल्यालाच सामोरे जायचे आहे मग त्यापेक्षा तो तणावच निर्माण होऊ न दिला तर.....
तुम्हाला काय वाटते याबद्दल हे मला Comment करून सांगायला विसरू नका आणि हो, आपण करत असलेलि धावपळ खरचं तितकी गरजेची आहे का? या बद्दल विचार नक्कीच करा....
Taking action towards something proactively is better than just giving reaction to it.

टिप्पण्या