मुख्य सामग्रीवर वगळा

अविद्या आणि आपण

एकदा बादशाह अकबराने दरबाराला उद्देशुन प्रश्न केला हि अविद्या काय असते? पण बादशाहाला कोणी समर्पक उत्तर द्यायना, शेवटी बादशाह ने बिरबल ला तोच प्रश्न विचारला, बादशाह म्हणाला बिरबल काय तू सु्ध्दा माझ्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर नाही देऊ शकणार का? यावर बिरबल म्हणाला बादशाह मी नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो पण… पण काय बिरबल? बादशाह म्हणाला. त्यावर बिरबल म्हणाला कि मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो पण मला चार पाच दिवसांची सुट्रटी पाहीजे मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल पण मी सध्या खुपच दमलेलो आहे त्यामुळे मला चार पाच दिवसांची तरी सुट्टी मिळाव‍ि अशी मी विनंती करतो सुट्टीवरुन आल्यावर मी आपल्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईल. यावर बादशाह बिरबल ला सुट्टी देतात.

बिरबल एका चांभाराकडे जाऊन त्याला एक जोडी साधारण मापाची चप्पल शिवायला सांगतो, पण चप्पल कशी? त्या चपलीला हिरे मोती अणखी वेगवेगळ्या प्रकारचे किमती रत्ने त्या चपलिला लावायला सांगतो. दोन दिवसा नंतर त्या चांभारा कडुन चप्पल घेऊन यतो व रात्री त्या जोड्यामधिल एक चप्पल तो गुपचुप पणे एका मशिदी च्या अंगणात ठेऊन येतो.

पहाटे ज्या वेळी मौलाना साहेब नमाज अदा करण्यासाठी येतात त्यावेळी त्या हिरे मोती जडलेल्या चपलांना पाहून आश्चर्यात पडतात ते विचार करतात की इतकी अदभुद चपल्ल नक्की कोणाची असेल? पण त्यांना ऊत्तर काही केल्या सुचत नाही आणि सरते शेवटी ते या निर्षकशा पर्यत पाहतात की ती चपल्ल नक्कीच देवाची असणार जी घाई घाईत इथेच सुटली असणार. आता ती चप्पल देवाची आणि ती आपल्याला सापडली म्हणजे देव नक्कीच आपल्यावर खुश आहे असा मौलाना साहेबांचा समज होतो.

देवाच्या चपलेचे दर्शन बादशाहाला नक्कीच झाले पाहीजे हा विचार करुन ती चप्पल घेऊन मौलाना साहेब राजदरबारात पोहचतात. बादशाहाला घडलेला सगळा वृत्तांत सांगुन आपण काढलेला निर्ष्कश बादशाहाला सांगतात. आणि त्या चपलेची पुजा अर्चना व्हावी या उद्देशाने आपल्या राज्यात एखादे प्रार्थना स्थळ सारखे काही आपण बांधावे जिथे या देवाच्या चपलेचे म्हणजेच देवाची खुणेचे सर्वांना दर्शन करता येईल असा प्रस्ताव सुध्दा मौलाना साहेब बादशाहा समोर ठेवतात. बादशाहा सुध्दा ती चप्पल एकदा निरखुन पाहतो आणि इतकी आगळी वेगळी चप्पल कोणी माणुस काही वापरणार नाही आणि वापरत असला तरी कोणी अस विसरुण जाण शक्य नाही आणि त्यातल्या त्यात बादशाहाची मौलाना साहेबावर श्रध्दा असल्यामुळे बादशाहाने सुद्धा बादशाहाने सुद्धा मौलाना साहेबांचा प्रस्तावाला संमत्ती दिलि.

दुसऱ्या दिवशी बिरबल बादशाहाच्या आधिच राजदरबारात हजर होता. अत्यंत चिंतेत असलेल्या बिरबलकडे बादशाहाचे दरबारात येता – येताच लक्ष गेले व सिंहासनावर बसल्या बसल्या बादशाहाने बिरबल ला त्याच्या चिंतेचे कारण विचारले. “काय सांगु बादशाहा तुम्हाला मी सुट्टी घेऊन गावी गेलो होतो त्याच दरम्यान आमच्या घरी चोरी झालि जहापनाह” बिरबल म्हणाला. “काय काय चोरीला गेले बिरबल?” बादशाहाने विचारले. “मी बाकी काही जास्त पाहिले नाही जहापनाह काही चांदीचे भांडे आणि एक आमची धरोहर चोरीला गेलि, बाकी काही परत मिळो न मिळो महाराज पण मला कृपया ती धरोहर परत मिळवून द्या जहापनाह.” बिरबलने सांगितले.

आपल्या राज्यात आणि तेही तुझ्या घरी चोरी… आपल्या राज्यात चोरी करण्याचे ज्याने कोणी धाडस केलय त्याला आपण नक्कीच गजा आड करु बिरबल पण, माला एक गोष्ट समजत नाहीए कि तु अस का म्हणालास कि बाकि काही परत मिळो न मिळो पण चोरीला गेलेलि धरोहर मिळवुन द्या, आपलि सैन्यशक्ति समर्थ आहे राज्यात कोणत्याही प्रकारच्या अपराध्याला शोधुन त्याला योग्य ती शिक्षा करण्यासाठी त्यामुळे तु निश्चिंत रहा बिरबल. पण मला तु अस म्हणाण्या मागच कारण सांग.

निश्चिंत कसा राहु महाराज बाकि सगळ परत मिळवता येईल पण आमची पारंपारीक धरोहर आहे जहापनाह. हे ऐकुन बादशाहाची उत्सुकता अणखिण चाळवलि गेली नेमक काय आहे बिरबल ती एखादा खजिना किंवा खजिन्याचा नकाशा वगैरे तर नाही? नाही महाराज ती धरोहर आमच्या आजोबांची चप्पल होती जी आम्ही त्यांची शेवटची निशानि आणि त्यांचा आशिर्वाद समजुन खुप जपुन ठेवलि होती. इतकच नाही महाराज ती काही साधि सुधि चप्पल नव्हती महाराज त्यात अनेक प्रकारचे रत्ने जडलेले आहेत बादशाह आणि घेऊन गेला तो गेला एकच चप्पल घेऊन ही पहा त्या चोरीला गेलेलया चपलेची जोडी, अस म्हणुन बिरबलने त्याच्या कडे असलेलि चप्पल बादशाहा कडे दिलि.


आता बादशाहाची काय अवस्था झालि असेल याची आपण कल्पना करुच शकतो, आपणही कित्येक वेळी अस करत नाही का, ही गोष्ट कितपत खरी किंवा खोटी आहे यापेक्षा आपलयासाठी त्यात काय आहे हे जास्त महत्वाचे नाही का.! एखादी गोष्ट पुर्ण माहीत नसते त्यावेळी आपण स्वत:च त्या गोष्टीच्या निष्कर्ष काढुन मोकळे होतो. आपण काढलेला निष्कर्ष बरोबर सुध्दा आहे की नाही याची दखल घेण्याचे कष्ट सुध्दा आपण घेत नाही अर्थात या आपण मध्ये मी सुध्दा येतोच मी काही याला अपवाद नाही. पण आपल्याला या गोष्टी मधुन हे शिकायला मिळते कि एखादी गोष्ट किंवा घटना यांच्या बद्दल कोणत्याही निष्कर्षा पर्यंत पोहचण्या आगोदर आपण त्या घटनेची आणि आपण काढलेल्या निष्कर्षाची पुनर्तपासनि करायला हवि याकडे आपण कित्येक वेळी सर्रास दुर्लक्ष करतो. नाही का?

शेवटी इतकच म्हणावस वाटते की याच छोट्या छोट्या गोष्टि असतात ज्यामधुन आपल्याला खुप काही शिकायला मिळते.

आपल्याला भरलेले गाडगे ही पोस्ट सुद्धा नक्की आवडेल 

तुम्हाला ही पोस्ट कशी वाटलि आणि आणखि इतर ही काही सूचना असतिल तर त्या comment करायला विसरु नका.

टिप्पण्या