मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मिलना कभी फुर्सत से दिल की हर शिकायत भुलाकर...

मिलना कभी फुर्सत से किसी अजनबी की तरह, ना किसी उम्मीद से और ना ही किसी नाराजगी को दिल में रखकर.. । पुरी करेंगे वो बातें जो अधुरी रह गयी, बिना किसी ख्वाहिश को दिल में जगाएं रखकर.. । मिलना कभी कुछ पलों के लिए दिल से हर शिकायत भुलाकर, खुलकर वो बातें करेंगे जो अनकही रह गयी...। कहते हैं, अधुरी कहानियां बोहोत सारे रास्ते खोल देती है उन्हें पुरी करने के लिए.., पर कोई बताता नहीं की कुछ कहानियां हसना भुला देती है खुद पुरा होते होते..। इसलिए गुजारिश है तुमसे, मिलना कभी फुर्सत में फिर एक बार अजनबी बनकर - मिलकर उन छुटी हुई अधुरी बातो को पूरा करने के लिए, उन अधुरी कहानियों को उनके अंजाम तक पहुंचाने के लिए..। मिलना कभी फुर्सत से किसी अजनबी की तरह दिल की हर शिकायत भुलाकर..!

आई

शब्दांत नाही, स्वरात अशी ती माझ्या वसे.. कधी सांगती मारूनी मुटकुनि - कधि नाटकी रूसुनी बसे... येता अश्रु डोळ्यामध्ये आधि माझे मग तिचे पुसे.... उभी पठिशी सदैव माझ्या, मोल कसे ना माझे चढे? आहे सर्वस्व ती माझे मग काय मागु मी तिच्या पुढे.... शब्दांमध्ये नाही, स्वरात अशी ती माझ्या वसे...

वक्त - वक्त की बात....

कभी वक्त तुम्हारे साथ है, कभी वक्त हमारे साथ है. वक्त की यही बात है की, ना वक्त तुम्हारे पास है - ना वक्त हमारे पास है... एक वक्त सुनहरी सुबह, एक वक्त अंधेरी रात है...

स्व संवाद - एकांत

किती तरी वेळा आपण एकाकीपण आणि एकांत यामध्ये गोंधळ करून टाकतो... आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत म्हणजे एकांतात आहोत पण खरेच असे असते...? तूकाराम महाराज म्हणतात एकांतात आपलाच आपल्या सोबत वाद (बोलणे) चालु असतो.... काय बरोबर, काय चुकीचे याचा विचार आपण एकांतात करू शकतो... पण हल्लीच्या मनोरंजनाच्या विश्वात आपण मोकळे बसलो की आपण एकांत अनुभवण्या ऐवजी एकटेपणा अनुभवतो.... कराटे कीड नावाच्या एका सिनेमा मधिल एक खुप सुंदर आणि अर्थपुर्ण वाक्य मला ईथे आठवते.... "शांत होना और कुछ ना करना ये दोनो अलग बाते है" ज्या वेळी आपण एकटेपणाचा अनुभव करतो त्या वेळी आपण खुपदा उदास होतो पण एकांतात आपण शांत असतोत... एखाद्या घटनेचा विचार करताना एकटेपणा बाधक तर एकांत सहाय्यक असतो... शांत होना और कुछ ना करना ये दोनो अलग बाते है

किमयागारांचे गणित

पिकासो… खुप कमी लोक असतिल ज्यांने पिकासोचे नाव सुध्दा ऐकले नसेल. पिकासो हा मागच्या शतकातिल.. खर तर आजपर्यंत झालेल्या महत्वाच्या आणि जिनियस पेंटरस पैकि एक महत्वाचा पेंटर, तर तो एकदा प्रवासादरम्यान एका लहानशा गावात थांबला होता तस त्या गावकऱ्यापैकि कोणी त्याला ओळखेल याची शक्यता थोडीशी कमीच पण तो ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होतो तिथे असणाऱ्या एका महिलेने पिकासो ला ओळखले व एकदा सहज गप्पा मारता मारता तिने पिकासोकडे तिच्यासाठी एखदी पेंटिग बनवावि असा हट्रट धरला, त्यावर पिकासो म्हणाला कि सध्या मी प्रवासात आहे त्यामुळे माझ्याकडे पेंटिंग करण्यासाठी सामग्री नाही आहे, मी नंतर कधितरी नक्की तुमच्यासाठी पेंटिग बनवेल.. यावर ती महिला पिकासोला म्हणालि कि तुमच्यासारख्या व्यस्त माणसाची परत कधि भेट होईल कि नाही माहित नाही त्यामुळे प्लिज माझ्यासाठी तुम्हि आत्ताच एखादी पेंटिग बनवा मी तुमची खुप मोठी चहाती आहे. यावर पिकासोने हॉटेलच्या काऊंटर वरुन एक कागद आणि पेन घेऊन अवघ्या २० मि. मध्येच एक चित्र् रेखाटले. काहि क्षण विचार करुन ते चित्र त्या महिलेच्या हातात देत देत म्हणाले कि याची किमंत असेल १ मिलियन डॉलर. त्या...

भरलेले गाडगे

हि थोडीशी जुनी गोष्ट आहे ज्यावेळी अनेकदा लोकं एका गावावरुन दुसऱ्या गावाला पायी चालत जात.. असाच आज एक माणूस आपल्या गावाहून शेजारच्या गावी चालला होता , रस्ता जनुकाहि मोकळाच क्वचितच एखादा प्रवासी दिसत होता. काहीसा पठारी प्रदेश आणि डोक्यावर तळपता सुर्य आणि यामुळे आलेला थकवा आणि लागलेलि तहान यामुळे त्या माणसाचा जिव अगदी कासाविस झाला होता , आता खर तर त्याला पलिकडचं गाव गाठण्यापेक्षा पाणि पिने जास्त गरजेचे होते. एक दोन वेळा आधि मित्रांसोबत याच रस्त्याने गेलेला असल्याने त्याला जवळच एक लहानसा तलाव असलेला माहीती होते , तो तलाव थोडा आडमार्गि असून देखिल तो त्या तलावा जवळ गेला... एक... एक मिनिट थोडस थांबवतोय तुम्हाला पुढे सांगण्याआधि त्यासाठी माफ करा पण मला थोडस विचार करुन सांगा कि या परीस्थितित तुम्ही असता तर यावेळी तुम्ही काय केल असतं... ? तुम्ही म्हणाल काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोय हा.. बरोबर ना ? बरं जाऊद्या आपण गोष्ट पुढे नेऊयात. तलावा समोर गेल्यावर त्याला जरास हायसं वाटलं पण तो माणुस तसाच त्या तलावाकडे बघत ऊभा राहिला होता , त्यामाणसाला पाणि प्यायची इच्छा असून देखिल तो तसाच पण्याकडे...

व्यस्तपणा आणि धावपळ

आजचे युग हे व्यस्तपणाच युग आहे. आज प्रत्येक जणं काही ना काही काम करण्यात व्यस्त आहे मान्य आहे की काही जणं खरेच काही तरी महत्वाची कामे करण्यात व्यस्त आहेत , आपल्यापैकी कित्येक जणं उगाचचं व्यस्त आहेत , किमान आपण तस स्वत:ला भासवत तरी आहोत. कधी कधी खरेच काम करण्यात व्यस्त आहोत , काही काम नसेल तेव्हा Game खेळण्यात व्यस्त आहोत T.V. बघण्यात व्यस्त आहोत अगदिच काही नसेल तेव्हा स्वत:च्याच भुतकाळाच्या आठवणिमध्ये व्यस्त आहोत , कोणी स्वत:च्याच भुतकाळा पासून पळ काढण्यासाठी व्यस्त आहे तर आणखि कोणी माहिती नाहि कशा - कशात व्यस्त आहे. पण आपण आज व्यस्त आहोत हे मात्र खरं आहे , बरोबर ना ? कारण व्यस्त राहणे ही आजकालची fashion होऊन बसलिए आपण जर व्यस्त नसतोल तर आज आपल्याला अस वाटते की आपण काहीतरी चूकिचे करत आहोत , की काय कारण आपण आज एका जागि शांत बसणे विसरत चाललोय . शांत बसायचे म्हंटल की अगदि नको - नको ते विचार आपल्या मनात यायला चालू होतात. अर्थात याला कित्येक जणं अपवाद असतिलचं. पणं सर्वसाधारण पणे म्हंटलं तरी हे सत्यच आहे की आपल्याला व्यस्त असण्याची सवय झालि आहे. खरे आहे ना ? पणं कित्येक गोष्टी ज्या आपण श...