मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ध्यानाचे फायदे

ध्यान का करायला पाहीजे? (why everyone should meditate?) कींवा ध्यानाचे फायदे काय आहेत या बद्द्ल आपण थोडी चर्चा करणार आहोत.  आजकाल आपले जीवन खुपच धावपळीत चालले आहे, आपला दिवस घर - काम - घर आणि उरलेला वेळ मनोरंजनात व परीवार या सगळ्याचा विचार करण्यातच जातो यामुळे होत काय आहे की आपल्या मनावर येणारा ताण खुपच वाढत आहे, आपल्याकडे स्वत:साठी काही वेळ नाहिये. आपला दिवस भराचा वेळ कुठे निघून जातोय हे आपल्यालाच लक्षात येत नाही. आपण स्वतःला देखील वेळ देत नाही. बर ते जाऊ द्या आपण ध्यानधारणा करण्याचे काही फायदे कींवा benefits of meditation यावर चर्चा करूया ध्यान करण्याचे फायदे :- 1) मन शांत होते :- आपला मेंदू हा एखाद्या कथाकारा प्रमाणे असतो, आपले विचार आपला दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी आपण आपल्या नकळतपणे आपल्या सोयीनुसार समजून घेत असतो आणि पहायला गेलं तर त्यात किही चुकीचे नाही पण कित्येकवेळा आपल्या मनाची विनाकारण बडबड चालू असते. आजकाल तर प्रमाणाबाहेर विचार करण्याला ट्रेंड मानल जाते पण एकदा या पद्धतीने विचार करून पहा. अस समजा तुमच मन ही स्वतंत्र व्यक्ती आहे आणि सदैव तुमच्या सोबत असते. ...

Social media वरील निवडक पोस्ट्स - प्रमाण

ही कृष्णाजी नारायण आठल्ये यांची "प्रमाण" नावाची कविता आहे. आठवणीतील कविता यात ती वाचायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ती सर्वाची तोंडपाठ होती. 'केरळकोकीळ' ही त्यांना उपाधी होती. 'सासरची पाठवणी' ही त्यांची आणखी एक अजरामर कविता. मराठी विश्वकोश, मराठी चरित्रकोश, आठल्ये घराण्याचा इतिहास यात अधिक माहिती उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी अवश्य पहावी. अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे  २० रत्ने आहेत...........           अतीकोपता कार्य जाते  लयाला,  अती नम्रता पात्र होते भयाला । अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।। अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज । सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।। अती मोह हा दु:ख शोकास मूळ,  अती काळजी टाकणे हेही खूळ । सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।। अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया । न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।। अती दान तेही प्रपंचात छिद्र,  अती हीन ...

व्यक्त मन - भाग 2 ध्यान

आज थोड मनातल बोलणार आहे. थोडा स्वत:चा अनुभव थोड पुस्तकी अशी सगळ्यांची सरमिसळ करुण. आजची पोस्ट तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही अपेक्षा करतो. आपण सगळ्यांनी कोणत्याही प्रकारचा पुर्वाग्रह न धरता ही पोस्ट वाचावि आणि आपल मत किंवा अनुभव मला नक्की कळवावा अशी मी विनंती करेल. तर नक्की कोठुन सुरवात करायची बरं? तर आपल्या भारतात ध्यान या गोष्टीला खुप मोठ माणल जात, म्हणजे ध्यान करण्यासाठी आपल्याला सन्यास घ्यावा लागतो कींवा ध्यान ही म्हतारपणी करण्याची बाब आहे इत्यादी इत्यादी… बरोबर ना? अर्थात मी काही गहन प्रश्नांना सामोर नाही जाणार आपल्या आजच्या सवांदामध्ये जस कि who am i? self-discovery वगैरे वगैरे अर्थात ज्यांना हा प्रश्न पडत असेल त्यांचा भाग वेगळा पण आज मी ध्यान करायला कशी सुरवात केली? याबद्दल सांगणार आहे. शेवटी हा अनुभवाचा भाग आहे पण तरीही काही गोष्टी नसतात का ज्यांच्या बद्दल आपल्याला उत्सुकता असते त्यातलि आपलि ही एक उत्सुकता. आपल्या भारतिय संस्कृती मध्ये ध्यानाचे प्रकार आपल्या दैनंदिन आचरनात आहेत उदाहरणार्थ रोज पुजा करणे नामस्मरण करणे इ. कधि कधि म्हणाव वाटत की जस पाश्चात्य देशांनी अनेक प्रकारच्या त...

अविद्या आणि आपण

एकदा बादशाह अकबराने दरबाराला उद्देशुन प्रश्न केला हि अविद्या काय असते? पण बादशाहाला कोणी समर्पक उत्तर द्यायना, शेवटी बादशाह ने बिरबल ला तोच प्रश्न विचारला, बादशाह म्हणाला बिरबल काय तू सु्ध्दा माझ्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर नाही देऊ शकणार का? यावर बिरबल म्हणाला बादशाह मी नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो पण… पण काय बिरबल? बादशाह म्हणाला. त्यावर बिरबल म्हणाला कि मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो पण मला चार पाच दिवसांची सुट्रटी पाहीजे मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल पण मी सध्या खुपच दमलेलो आहे त्यामुळे मला चार पाच दिवसांची तरी सुट्टी मिळाव‍ि अशी मी विनंती करतो सुट्टीवरुन आल्यावर मी आपल्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईल. यावर बादशाह बिरबल ला सुट्टी देतात. बिरबल एका चांभाराकडे जाऊन त्याला एक जोडी साधारण मापाची चप्पल शिवायला सांगतो, पण चप्पल कशी? त्या चपलीला हिरे मोती अणखी वेगवेगळ्या प्रकारचे किमती रत्ने त्या चपलिला लावायला सांगतो. दोन दिवसा नंतर त्या चांभारा कडुन चप्पल घेऊन यतो व रात्री त्या जोड्यामधिल एक चप्पल तो गुपचुप पणे एका मशिदी च्या अंगणात ठेऊन येतो. पहाट...

बस तुम चलते रहना

  हर सफर शुरू होता है कभी ना कभी खत्म होने के लिए, सोचकर ये बात बस तुम एक एक कदम चलते रहना। सफर जिंदगी का आसान नहीं होता जानकर ये सच तुम आगे बढते रहना। लाख मुश्किलें आएगी जिंदगी में तुम्हारी, तुम बस जिद से अडे रहना, हर मुश्किल को पार करते हुए तुम बस चलते रहना। हमराही कई मिलेंगे तुमसे पर हरकीसिको अपना सफर तय करना है समझकर ये बात बस तुम आगे बढते रहना, तुम बस चलते रहना । हो सकता है कि कई बार तुम जिस रास्ते पर चल रहे हों वो हर रास्ता बंद हो जाये, तब खुद के लिए एक नया रास्ता बनाकर तुम बस चलते रहना। हो सकता है कि हरेक व्यक्ति उंगलि उठाए तुम पर तब अपनी सच्चाई जानकर तुम आगे बढ जाना, बस तुम चलते रहना। लाख रूलाए जिंदगी तुम्हे पर तुम मिठी सी मुस्कान होठों पर लिए तुम अपना सफर पूरा करना, बस तुम चलते रहना।

व्यक्त मन - भाग १

  असे म्हणतात कि माणसाच्या मनात एका दिवसात जवळ पास ७० ते ८० हजार विचार येतात, आणि त्यातले बहूतेक विचार हे नकारात्मक किंवा असे असतात जे आपल्या काही कामाचेच नसतात. हिंदी मध्ये एक म्हण आहे “खालि दिमाग शैतान का घर” पण जर एखाद्याच्या डोक्यात बिनाकामाचे किंवा नकारात्मक किंवा नकोसे असणारे विचारच प्रमाणा बाहेर असतिल तर त्याच काय? अशा माणसाचे डोके सुध्दा काही शैतानाच्या घरापेक्षा कमी नाही, बरोबर ना? माणसाच्या अंतरमनाच्या शक्तिला आपण खुपच कमी लेखतो, स्वामि विवेकानंद आणि त्यांच्यासारख्या अनेक महान माणसांनी आपल्याला वेळोवेळी विचांरांचे आणि मानवि मानाच्या शक्तिचे महत्व सांगितलेले आहेच तरी आपण सगळेच त्याकडे दुर्लक्ष करतो. अर्थात विचारांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये पण आपल्याला आपले विचार नियंत्रित नाही करता येत, आणि आपण शांत एका जागेवर बसुन अस तर नाही म्हणु शकत कि आता मी काहीच विचार करणार नाही. आधि तर तसा प्रयत्न आपल्या सारख्या सामान्य माणसाने करणे एकप्रकारे हास्यास्पदच आहे. असो. ईतक काही सांगायचा मुख्य मुद्दा असा कि आता corona असल्यामुळे वातावरण खुपच नकारात्मक झालेल आहे...